सेवेंत असताना अथवा सेवानिवृत्तीनंतर शासकीय कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास चरितार्थाचे साधन नसल्याने पूर्णतः त्याच्या / तिच्यावर अवलंबून असलेले त्याचे /तिचे पालक कुठल्याही कुटुंब निवृत्तिवेतनास पात्र होत नाहीत. मात्र शासनाने सेवानिवृत्ती वेतन नियमातील कुटुंब या संज्ञेच्या व्याखेत नुकतीच सुधारणा केली आहे व कुटुंब या संज्ञेत 'एकट्या' शासकीय कर्मचा-याच्या पालकांचा समावेश करण्यात आला आहे.
यासंदर्भात वित्त विभागाने दि. २२ जानेवारी २०१४ रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णय, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था , कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे व जिल्हा परिषदांचे पात्र व निृवत्तिेवेतनधारक/कुटुंब निृवत्तिेवेतनधारक यांना, योग्य त्या फेरफारासह, लागू राहणार आहे.
सदर शासन निर्णय या ब्लॉगवर " Recently Issued G.Rs. and Circulars" या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक १५९ वर उपलब्ध आहे. जरूर तर तो डाउनलोड करून घेता येईल.

No comments:
Post a Comment