Thought for Today, 29 th June 2020

Life is a trip. The only problem is that it does not come with a map. We have to search our own routes to reach our destination.

Monday, November 04, 2019

जीवनप्रमाणपत्र - निवृत्तीवेतन धारकांसाठी खास सुविधा

राज्यशासनाकडून व केंद्रशासनाकडून निवृत्तीवेतन  घेणा-या निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे जीवनप्रमाणपत्र (Life certificate)   ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सादर करावयाचे आहे. ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतले जाते त्या बँकेत सदर प्रमाणपत्र सादर करण्याची व्यवस्था आहे. सदर प्रमाणपत्र कोषागार  कार्यालयात समक्ष जाऊन सादर करता येते. निवृत्तीवेतन धारकांच्या सोयीसाठी प्रमाणपत्र सादर करण्याची सोय बाणेर रोडवरील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) या संस्थेच्या मोफतसल्ला  कक्षात  करण्यात आली आहे.इच्छुक निवृत्तिवेतनधारकांनी कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या  वेळेत, त्यांचा निवृत्तीवेतन आदेश, आधारकार्ड, बँकेचे पासबुक व स्वतःचा मोबाईल फोन घेऊन येणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी  कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२०-२५६०८१६५ किंवा ०२०-२५६०८१६८ वर संपर्क साधावा.

विकलांग व अपंग निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या बँकेच्या शाखेत अथवा कोषागार  कार्यालयात कार्यालयात जाणे अशक्य असेल तर निवृत्तिवेतनधारकांच्या निवासस्थानी जाऊन बँकेचे अथवा कोषागार कार्यालयाचे कर्मचारी सदर प्रमाणपत्र देण्यासाठी मदत करतात अशी धारणा आहे. अशाच त-हेची सेवा यशदा संस्थेच्या मोफत सल्ला कक्षातर्फे दिली जाणार आहे. मात्र या सेवेचा लाभ घेण्यासाठी संबंधित निवृत्तीवेतन धारकांनी दि. २० नोव्हेम्बर २०१९ पूर्वी सर्वश्री सुशीलकुमार घाटे (मो.नं ९८८११२६०१०) , संजय शेलार (मो.नं ८४११८९०३४९) व हेमंत पाराशरे ( मो.नं. ९४२१०५७५११) यांचेशी संपर्क साधावा.