Thought for Today, 29 th June 2020

Life is a trip. The only problem is that it does not come with a map. We have to search our own routes to reach our destination.

Thursday, November 29, 2012

निवृत्ती वेतनधारक व विभागीय कार्यवाही

शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याचेविरुध्द चालू असलेली विभागीय चौकशी संपुष्टात येते काय, सेवानिवृत्तीनंतर विभागीय कार्यवाही चालू करता येते काय व त्याचा निवृत्ती वेतनावर काय परिणाम होतो . यासंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा नियमात नेमक्या काय तरतुदी आहेत याबाबतची विचारणा अधिकारी, कर्मचारी विशेषत: सेवानिवृत्त होणा-या किंवा सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचा-याकडून वारंवार केली जाते. म्हणून यासंदर्भातील सेवानिय्मात नेमक्या तरतुदी व नेहमी त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणारा लेख नुकताच यशदातर्फे प्रकाशित केल्या जाणा-या " यशोमंथन " या मासिकात प्रसिध्द करण्यात आला आहे.तो लेख या ब्लॉगवर " Worth Visiting" या शीर्षकाखाली देण्यात आला आहे. संबंधितानी तो जरूर वाचा व जरूर तर तो डाउनलोड करून घ्यावा.

Friday, November 09, 2012

यशदा संस्थेने नुकतेच प्रसिध्द केलेले मराठी पुस्तक महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९


                                       
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९(मराठी) हे श्रीधर जोशी, भा.प्र.से.(नि) व माजी उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, यांनी संपादित केलेले पुस्तक यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या राज्याच्या अग्रणी प्रशिक्षण संस्थेने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात ३१- ०८- २०१२ पर्यंत सुधारित नियम ,महत्वाच्या टीपा, महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके, चौकशी अधिकारी/सादरकर्ता अधिकारी/ बचाव सहाय्यक/ शिस्तभंगविषयक अधिकारी/ अपीलीय अधिकारी इत्यादींसाठी मार्गदर्शक सूचना,न्यायालयीन निर्णय इत्यादी माहिती दिली आहे. सदर पुस्तक चौकशी अधिकारी, विभागीय अधिकारी व कर्मचारी तसेच वकील वर्गास देखील उपयुक्त आहे.

सदर पुस्तक यशदा संस्थेत १५० रुपयांस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीसाठी ०२०-२५६०८२६६ या दूरध्वनीवर श्रीमती मनीषा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.

Tuesday, November 06, 2012

New book " M.C.S.(D.& A.) Rules 1979 "(As amended upto 1-8-2012)

Yashvantrav Chavan Academy of Development Administration Pune  has recently published the book viz. Maharashtra Civil Services (Discipline & Appeal) Rules 1979 (English) edited by me .This book contains the Rules as modified upto 01-08-2012, along with  Short notes, Important Governement Circulars etc. The book will be of great  help to the Inquiry officers, departmental authorities and officers/ employees of the  Government of Maharshtra.

The book is available for Rs. 100/- in Yashada. Any inquiry in this regard may be made with Smt. Maneesha Kulkarni , Publication Cell, Yashada,Pune, whose telephone number is 020-25608266.