महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) नियम १९७९ या मी संपादित केलेल्या पुस्तकाच्या पहिल्या व दुस-या आवृत्तीस उत्तम प्रतिसाद लाभला व पुस्तकाच्या सर्व प्रती संपून बराच काळ लोटला. पुस्तकाची तिसरी आवृत्ती काढावी म्हणून अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच पत्राद्वारे व इंटरनेटच्या माध्यमातून मागणी केली.म्हणून या पुस्तकाची तिसरी आवृत्ती , यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनीने नुकतीच प्रसिध्द केली आहे.
सदर पुस्तकात दि. १ जून २०१४ पर्यंत सुधारित केलेले नियम देण्यात आले आहेत. याशिवाय सदर पुस्तकात संक्षिप्त टीपा, शिस्तभंगविषयक कार्यवाही संदर्भातील महत्वाचे शासन निर्णय व महत्वाची परिपत्रके, अंतर्भूत करण्यात आली आहेत. याशिवाय शिस्तभंग विषयक अधिकारी,चौकशी अधिकारी, सादरकर्ता अधिकारी, बचाव सहाय्यक अपिलीय अधिकारी इत्यादी अधिका-या साठी सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सेवानिवृत्त कर्मचा-याविरुध्द कारवाई या विषयाबाबत स्वतंत्र प्रकरण देण्यात आले आहे.
या तिस-या आवृत्तीचे वैशिष्ठ्य असे आहे की, अभ्यासकांनी व वाचकांनी केलेल्या मागणीनुसार " शिस्तभंग विषयक कार्यवाहीची क्रमवार कार्यपध्दती" हे प्रकरण नव्याने अंतर्भूत करण्यात आले आहे.
पुस्तकाच्या तिस-या आवृत्तीस देखील अभ्यासक व शासकीय कर्मचारी उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा आहे.
पुस्तकाची किंमत २५० रुपये असली तरी हे पुस्तक यशदा मध्ये २०० रुपयास उपलब्ध आहे.पुस्तक पोस्टाने मागवायचे असेल तर त्या संदर्भात यशदाच्या प्रकाशन विभागाशी ०२०-२५६०८२६६ किंवा २५६०८२२७ या दूरध्वनी वर संपर्क साधावा.
पूर्वीप्रमाणेच पुस्तकाची तृतीय आवृत्तीचे संपादन करण्यासाठी मी कोणतेही मानधन घेतलेले नाही.

No comments:
Post a Comment