शिस्तभंग विषयक प्रकरणात शिस्तभंग विषयक अधिकारी सादरकर्ता अधिका-याची नेमणूक करतात. परंतु सादरकर्ता अधिका-यांना त्यांची नेमकी कर्तव्ये व जबाबदा-या काय आहेत याची कल्पना नसते, त्यामुळे शिस्तभंग विषयक अधिका-याची बाजू समर्थपणे चौकशी अधिका-या समोर मांडली जात नाही व त्याचा परिणाम असा होतो की अपचारी कर्मचारी दोषी असूनही त्याचेविरुध्द दोषारोप सिद्ध केले जात नाहीत व त्याची दोषारोपांपासून मुक्तता होते. असे अनेकवेळा अनुभवास येते. तसेच सादरकर्ता अधिका-याची कर्तव्ये व जबाबदा-या योग्य तऱ्हेने व समर्थपणे पार न पडणा-या अधिका-यांच्या विरुध्द कधीच कारवाई केली जात नाही. हे सर्व टाळण्यासाठी , सादरकर्ता अधिका-याची नेमकी कर्तव्ये व जबाबदा-या काय आहेत हे शासनाने ठरवून द्यावे व सादरकर्ता अधिका-याची नेमणूक करताना ,त्याची कर्तव्ये व जबाबदा-या काय आहेत याची यादी नेमणूक पत्रासोबत जोडावी अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने काढाव्यात अशी सूचना मी शासन बरेच दिवसापूर्वी केली होती. तसेच सादरकर्ता अधिका-याची कर्तव्ये व जबाबदा-या काय आहेत याची यादी शासनास पाठविली होती.
सांगण्यास आनंद होती की शासनाने वरील सूचना मान्य करून यासंदर्भातील परिपत्रक दि. २२ ऑगस्ट २०१४ रोजी निर्गमित केले आहे.सदर परिपत्रक " Recent and Important "या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक २४ वर या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.सर्व संबंधितांनी ते जरूर डाउनलोड करून घ्यावे व शासन परिपत्रकातील सूचनांची योग्य तऱ्हेने अंमल बजावणी करावी.

No comments:
Post a Comment