विभागीय चौकशीचे वेळी शिस्तभंग विषयक अधिका-याचे वतीने साक्ष देणा-या साक्षीदारांची साक्ष नोंदविली जाते . अशी साक्ष नोंदविताना इतर साक्षीदारांना उपस्थित राहू देण्याची परवानगी देता येईल कां, या प्रश्नाचे उत्तर, अलाहाबाद उच्च न्यायालयाने शारदा प्रसाद विश्वकर्मा विरुध्द उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणातील निकालपत्रात दिले आहे.
" एका साक्षीदाराची साक्ष नोंदविताना इतर साक्षीदारांना हजर राहण्याची परवानगी दिल्यास , साक्षीदाराच्या जवाबातील कमतरता / उणीवा भरून काढण्याची संधी इतर साक्षीदारांना त्यांची साक्ष देताना होऊ शकेल आणि ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वांच्या विरुद्ध होईल.सबब अशी परवानगी देणे उचित होणार नाही व अशी परवानगी दिल्यास ती विभागीय चौकशी रद्दबातल होऊ शकते." असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने वरील प्रकरणात दिला आहे.
वरील न्यायालयीन निर्णयाची नोंद संबंधितानी घ्यावी .अर्थात साक्ष नोंदविताना इतर साक्षीदारांना उपस्थित राहू देण्याची परवानगी देणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांच्या विरुध्द होईल हे तत्व अपचारी कर्मचा-याच्या वतीने साक्ष देणा-या साक्षीदारांची साक्ष नोंदविताना देखील लागू असेल.
वरील निकालपत्र या ब्लॉग वर " Recent and Important " या शिर्षकाखालील यादीत अनुक्रमांक १८ वर उपलब्ध आहे.ते जरूर तर डाउनलोड करून घेता येईल.

No comments:
Post a Comment