Thought for Today, 29 th June 2020

Life is a trip. The only problem is that it does not come with a map. We have to search our own routes to reach our destination.

Friday, November 09, 2012

यशदा संस्थेने नुकतेच प्रसिध्द केलेले मराठी पुस्तक महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९


                                       
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९(मराठी) हे श्रीधर जोशी, भा.प्र.से.(नि) व माजी उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, यांनी संपादित केलेले पुस्तक यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या राज्याच्या अग्रणी प्रशिक्षण संस्थेने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात ३१- ०८- २०१२ पर्यंत सुधारित नियम ,महत्वाच्या टीपा, महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके, चौकशी अधिकारी/सादरकर्ता अधिकारी/ बचाव सहाय्यक/ शिस्तभंगविषयक अधिकारी/ अपीलीय अधिकारी इत्यादींसाठी मार्गदर्शक सूचना,न्यायालयीन निर्णय इत्यादी माहिती दिली आहे. सदर पुस्तक चौकशी अधिकारी, विभागीय अधिकारी व कर्मचारी तसेच वकील वर्गास देखील उपयुक्त आहे.

सदर पुस्तक यशदा संस्थेत १५० रुपयांस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीसाठी ०२०-२५६०८२६६ या दूरध्वनीवर श्रीमती मनीषा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.

1 comment:

  1. rule 1979 / 19
    स्वतः च्या नावाने किंवा कुटुंबीयांच्या नावाने मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार केला असेल व सदर माहिती सक्षम प्राधिकारी यांना कळविले नसेल किंवा परवानगी घेतलेली नसेल तर कार्योत्तर परवानगी घेता येते का किंवा कशी घ्यावी या बाबत मार्गदर्शन मिळावे

    ReplyDelete