सदर व्हिडीओ चॅनेलची काय उद्दिष्टे आहेत हे सांगणारा एक पहिला व्हिडीओ " माणुसकीचा दर्शन " You Tube वर टाकला आहे. तसेच कर्मचा-यांना उपयुक्त असे नवीन व्हिडीओ लवकरच टाकणार आहे.
ह्या व्हिडीओ चॅनेलद्वारें प्रामुख्याने कर्मचा-यांना आस्थापना विषयक बाबींबाबत ,विशेषतः "विभागीय चौकशी" व " निवृत्तीवेतन " याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच कर्मचा-यांच्या प्रेरणादायी कार्याच्या कथा विशद केल्या जातील. त्याशिवाय अधिकारी व कर्मचारी कार्यरत असताना घडलेल्या घटना व त्यापासून कर्मचा-यांनी घ्यावयाचा बोध हे देखील कथन करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
वर नमूद केलेला व्हिडीओ आपण जरूर पाहावा. तो आपणास जरूर आवडेल. हा व्हिडीओ आपण इतरांना share करावा. तसेच ह्या व्हिडीओ चॅनेलला आपण जरूर subscribe करा. तसेच आपले अभिप्राय चॅनेल वर लिहा किंवा मला karmacharimitr@gmail या इमेल पत्त्यावर कळवा. तसेच विभागीय चौकशी संदर्भात आपल्याला कांहीं प्रश्न किंवा शंका असतील तर त्या देखील याच ईमेल पत्त्यावर कळवा . उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाईल.
माझ्या इंटरनेट वरील "विभागीय चौकशी" हा मराठीतील ब्लॉग व "Departmental Inquiry" हा इंग्लिश मधील ब्लॉग आपणा सर्वाना खूप उपयुक्त वाटला व त्यामुळे दोन्ही ब्लॉगला आपणाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. नवीन व्हिडिओ चॅनेल देखील आपणास बहुमोल व उपयुक्त ठरेल असा माझा प्रयत्न राहणार आहे.
धन्यवाद
No comments:
Post a Comment