Thought for Today, 12 th June 2018

Be careful what you say. You can say something hurtful in ten seconds, but ten years later, the wounds are still there.

Wednesday, March 27, 2013

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तपास करणा-या अधिका-यांना व कर्मचा-यांना रोख बक्षिसे जाहीर


२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावर पाकिस्तानातील अतिरक्यांनी हल्ला केला होता.त्यामुळे मुंबई शहरात तसेच संपूर्ण देशात भीतीचे व असुरक्षिततेचे  वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात विविध पोलिस  स्टेशन्स मध्ये एकूण १२ गुन्हे नोद्विण्यात आले होते.सदर गुन्ह्यात एक जिवंत अतिरेकी महंमद अजमल महमद कसाब सापडला होता . त्याला नुकतीच फाशी देण्यात आली.

वरील गुन्ह्यासंदर्भात अत्यंत कठोर परिश्रम घेऊन सखोल चौकशी करणा-या सर्वश्री राकेश मारिया व देवेन भारती या भारतीय पोलिस सेवेतील अधिका-यांना प्रशस्तीपत्रके व महाराष्ट्र पोलिस सेवेतील अधिक-यांना व पोलिस कर्मचा-यांना ६.५८ लाखाची रोख रकमेची बक्षिसे राज्यशासनाने नुकतीच जाहीर केली  आहेत.

स्वत:चा जीव धोक्यात घालून जनतेचे संरक्षण करणाऱ्या व बक्षीस प्राप्त करणा-या अधिका-यांचे व कर्मचा-यांचे हार्दिक अभिनंदन. चांगल्या कामगिरीबद्दल संबंधितांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणा-या राज्यशासनास धन्यवाद. 

No comments:

Post a Comment