Thought for Today, 29 th June 2020

Life is a trip. The only problem is that it does not come with a map. We have to search our own routes to reach our destination.

Wednesday, January 16, 2013

----------------आवाहन ---------------


मी गेल्या काही वर्षांपासून " विभागीय चौकशी " या विषयांवर मोफत मार्गदर्शन करत आहे . " मला बचाव सहाय्यक नेमावयाचा आहे , तेव्हां मला बचाव सहाय्यकाचे नाव सांगा " अशी विनंती माझ्याकडे येणारे कर्मचारी माझ्याकडे करतात . माझ्याकडे बचाव सहाय्यक म्हणून काम करणा-या कर्मचा-यांची यादी नाही. तंव्हा बचाव सहाय्यक म्हणून काम करणा-या कर्मचा-यंची यादी तयार करून ती ब्लॉगवर देण्याचा माझा मानस आहे. तेव्हां बचाव सहाय्यक म्हणून काम करणा-या केंद्रीय व राज्य शासनाच्या कर्मचा-यांनी खालील माहिती माझ्याकडे पोस्टाने अथवा इमेलद्वारे पाठवावी ही विनंती .

१) संपूर्ण नांव व जन्मतारीख
२) शिक्षण
३) सेवेत आहात की सेवानिवृत्त
४) शासकीय सेवेत सांभाळलेले पद
५) बचाव सहाय्यक म्हणून किती वर्षांचा अनुभव
६) पत्रव्यवहाराचा पत्ता व फोन नंबर

वरील माहिती माझ्याकडे खालील पत्त्यावर अथवा इमेलद्वारे पाठवावी .
श्रीधर दत्तात्रय जोशी , भाप्रसे (नि)
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी
राजभवन आवार , बाणेर रोड , पुणे ४११००७
इमेल - shridharji@hotmail.com

No comments:

Post a Comment