Thought for Today, 29 th June 2020

Life is a trip. The only problem is that it does not come with a map. We have to search our own routes to reach our destination.

Thursday, January 11, 2018

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ या पुस्तकाची चौथी आवृत्ती ( ( ३१-१०-२०१७ पर्यंत सुधारित) प्रसिध्द झाली

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ या पुस्तकाची  तिसरी आवृत्ती २०१४ मध्ये काढली होती. त्या पुस्तकास उत्तम प्रतिसाद लाभला व त्या पुस्तकाच्या सर्व प्रति संपून बरेच दिवस झाले . सदर पुस्तकाची सुधारित आवृत्ती काढावी अशा अर्थाची पत्रे. मेल्स व तोंडी सूचना अनेक अधिकारी व कर्मचारी यांचेकडून  आल्या होत्या. परंतु इतर कामांमुळे व माझ्या  प्रकृती अस्वास्थामुळे पुस्तकाची  पुढील आवृत्ती  काढणे शक्य झाले नव्हते . मात्र आता  पुस्तकाची चौथी आवृत्ती यशदाने नुकतीच प्रसिध्द्व केली आहे.  सदर पुस्तकाची खालील वैशिष्ठ्ये आहेत.

१) दि. ३१-१०-२०१७ पर्यंत केलेल्या सुधारणासहित अद्यावत नियम व त्यावरील संक्षिप्त टीपा  व महत्वाचे न्यायालयीन निर्णय पुस्तकात  देण्यात आले आहेत.

२) पुस्तकात अद्यावत महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक) नियम १९७९ प्रथमच देण्यात आले आहेत.

३) " दोषारोपपत्र कसे तयार करावे"  या अत्यंत महत्वाच्या विषयाबाबत मार्गदर्शक सूचना असणारे स्वतंत्र प्रकरण अंतर्भूत  करण्यात आले आहे.

४) " प्राथमिक चौकशी " व "महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण " याबाबत सर्वकंष माहिती व्हावी म्हणू या विषयाबाबतचे संभाव्य प्रश्न व उत्तरे असणारी स्वतंत्र प्रकरणे अंतर्भूत करण्यात आली आहेत.

५) विभागीय चौकशी बाबतचे महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके पुस्तकात अंतर्भत करण्यात आली आहेत.

सर्व शासकीय तसेच शासनाची महामंडळे, राज्यातील  विद्यापीठे तसेच इतर संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी या सर्वांसाठी उपयुक्त  असलेल्या या पुस्तकांची किंमत रुपये  ३५० असली तरी हे पुस्तक  यशदामध्ये सवलतीच्या दरानं  म्हणजे फक्त  २१० रुपयास उपलब्ध आहे.

हे पुस्तक नेट बँकिंग द्वारे म्हणजे NEFT किंवा RTGS द्वारे पुस्तकाची किंमत रु. २१० अधिक टपाल खर्च रु. १०० म्हणजे एकूण रु. ३१० पाठविल्यास हे पुस्तक SPEED POST ने यशदाच्या प्रकाशन विभागातर्फे पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र पैसे NEFT अथवा RTGS पाठविल्यास  तसे  व आपला पत्ता ई मेलने प्रकाशन विभागाच्या yashdabooks@gmail.com या  address  वर  मेलने जरूर कळवावा   म्हणजे पुस्तक दिलेल्या पत्त्यावर पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.  पैसे  NEFT अथवा RTGS ने पाठविण्यासाठी यशदाच्या बँक अकाउंट संबंधी तपशील पुढे दिला आहे.

Name of Bank                IDBI

Name of A/C holder -    Director General, Yashvantrav Chavan                                               Academy Of Development Administration

Account Number-          062104000065663

IFSC Code-                    IBKL0000062

पैसे " डायरेक्टर जनरल ,यशदा " यांचे नांवे चेकने, अथवा  draft ने किंवा मनीऑर्डरने यशदाच्या पत्त्यावर पाठविल्यास देखील पुस्तक पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
  
अधिक माहितीसाठी यशदाच्या प्रकाशन विभागाशी  ०२०-२५६०८२६६ किंवा ०२०-२५६०८२३४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. 



9 comments:

  1. पुस्तक पाठवा सर पैसे ट्रान्स्फर केले वरील खात्यात 7588308860

    ReplyDelete
  2. Yashdabooks@gmail.com हा इमेल अस्तित्वात नाही

    ReplyDelete
  3. Sir
    I am a public Servant I have my follwing query regarding Departmental Enquiry Please Guide
    If a employee trapped by ACB and ACB Asking our office to file a indictment in a court. Which points/things to take care before Giving such permission to ACB.
    Please guide me regarding the same
    Thank You

    ReplyDelete
  4. Nokari laglyawar Ek varshachya aat Medical Bill kadhle 2012 che prakaran ahe ata tya billawar akshep lavla ahe yawar kay utter dyave

    ReplyDelete
  5. मनपा सेवेंत पती पत्नी दोघे सेवेत अस्ताना एकाने वैद्यकिय कारणाने सेवा घेतल्या नंतर वारसा हक्काने नोकरी त्यांच्या मुलाला अथवा नामनिर्देशित व्यक्तीला वारसा हक्क प्राप्त. होतो का? आणि अनुसुचित जाती चे जात वैध्यता प्रमाणपत्र नामनिर्देशित व्यक्तिला बंधनकारक आहे का?

    ReplyDelete
  6. वैद्यकिय कारणाने सेवा निवृत्ति घेतली असेल तर

    ReplyDelete
  7. Resp sir,in my DE...tyani mogham aarop laavle aani mazyavrr ACB case hoti tyabarun DE zali..but chowkshi adhikari yaani samarop ahwaal madhe lihile aahe ki mazya viruddhh paise ghenyavhe je aarop hote te purava naslyane siddh hott nahi ...tari tya case madhe mi aaropi atak karaysathi dusrya dept che police yaanchi madat ghetli yaavarun mala demossion ka karnyaat yeu naye ase mogham aarop thevun show cause dilaay ..

    ReplyDelete