Thought for Today, 29 th June 2020

Life is a trip. The only problem is that it does not come with a map. We have to search our own routes to reach our destination.

Monday, June 09, 2014

State Government Employees have to submit property Return every year

शासकीय कर्मचा-यांना (गट ड चे कर्मचारी वगळून) नियुक्तीचे वेळी व त्यानंतर दर ५ वर्षांनी मालमत्तेचे व दायित्वाचे विवरण सादर करावे  लागत असे. शासनाने या संदर्भात पूर्वी दिलेल्या सूचना अधिक्रमित करून दिनांक २ जून २०१४ च्या शासन निर्णयाअन्वयेखालील सूचना निर्गमित केल्या आहेत.

प्रथम नियुक्तीचे वेळी सादर करावयाचे विवरणपत्र : 

 प्रत्येक राज्य शासकीय कर्मचा-याने ( गट- ड चे कर्मचारी वगळून) शासकीय सेवेत प्रथम प्रवेश करतेवेळी नियुक्ती दिनांकापासून २ महिन्याच्या कालावधीत मालमत्तेचे  व दायित्वाचे विवरण पत्र शासनास/ विभाग प्रमुखास/कार्यालयीन प्रमुखास  सादर करावयाचे आहे.

त्यानंतर सादर करावयाचे विवरणपत्र :

 प्रथम नियुक्तीनंतर  प्रत्येक वर्षाच्या मार्च अखेरीस असलेली मालमत्ता व दायित्वे दाखविणारे विवरण पत्र प्रत्येक  वर्षाच्या जून अखेपर्यंत सादर करावयाचे आहे.

सदर विवरण पत्रे सीलबंद लखोट्यात सादर करावयाची आहेत. 

 शासनामधील सर्व टप्प्यावरील पदोन्नती , आश्वासित योजने अंतर्गत पदोन्नती, प्रतिनियुक्ती, विदेश दौरा  यासाठी,  त्या त्या वर्षाची विवरणपत्रे सादर केलेली असली पाहिजेत अशी पूर्व अट  वरील शासननिर्णयाद्वारे विहित करण्यात आली आहे.

मालमता व दायित्वाच्या विवरण पत्राचा नमुना सादर शासन निर्णया सोबत जोडला आहे.


वर नमूद केलेला दिनांक २ जून २०१४ चा महत्वपूर्ण शासन निर्णय या ब्लॉग वर " Recent and Important" या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक १७ वर उपलब्ध आहे.जरूर तर तो डाउनलोड करून घेता येऊ शकेल.

No comments:

Post a Comment