Thought for Today, 29 th June 2020

Life is a trip. The only problem is that it does not come with a map. We have to search our own routes to reach our destination.

Monday, August 05, 2013

निलंबित कर्मचारी व कार्यालयीन हजेरीपट

शासकीय कर्मचा-याला निलंबित केल्यावर , निलंबित कर्मचा-याने दररोज कार्यालयात येऊन हजेरीपटावर सही करावी असे आदेश काही शिस्तभंग विषयक अधिकारी काढतात असे निदर्शनास आले आहे.

कर्मचा-यास निलंबित केल्यावर निलंबन काळातील त्याचे मुख्यालय कोणते राहील हे निलंबन आदेशात नमूद करावे लागते. सर्वसाधरणपणे निलंबना पूर्वी ज्या ठिकाणी कर्मचारी काम करीत होता ते ठिकाण त्याचे निलंबन कळतील मुख्यालय ठरविले जाते. विभागीय चौकशीचे वेळी कर्मचा-याने ठराविक तारखेस व वेळेवर उपस्थित राहावे म्हणून त्याचे कामाचे ठिकाण मुख्यालय म्हणून ठरविले जाते.

निलंबित कर्मचा-याने दररोज कार्यालयात येऊन हजेरीपटावर सही करावी अशी अपेक्षा नसते.किंबहुना निलंबित कर्मचारी कार्यालयात आल्यास त्याला त्याच्याविरुध्च्या पुराव्यात फेरफार करण्याची संधी मिळू शकते.त्याच बरोबर निलंबित कर्मचा-यास दररोज कार्यालयात येणे हे देखील अपमानास्पद वाटते.

निलंबित कर्मचा-यास दररोज कार्यालयात येऊन हजेरीपटावर सही करावी असे आदेश काढण्याची तरतूद नियमात नाही.म्हणून असे आदेश काढणे हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे असा निर्णय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने झोनल व्यवस्थापक , फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया विरुद्ध खलील अहमद सिद्दिकी १९८२ (२) एसएलआर ७७९ (आंध्र प्रदेश) या प्रकरणात दिला आहे. संबंधितानी याची नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment