विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट ( क्रिमिलेअर) वगळून इतरांना आरक्षणाचे फायदे दिले जातात. परंतु उन्नत व प्रगत गटाचे नेमके निकष कोणते आहेत यासंदर्भात अनेकांचे समज- गैरसमज आहेत .त्यामुळे अनेकवेळा याबाबत विचारणा केली जाते. तसेच याबाबत नेमके ज्ञान नसल्याने आरक्षणाचा फायदा पात्र असलेल्या उमेदवारांना मिळत नाही.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने उन्नत व प्रगत गटाचे नेमके निकष काय आहेत्त व Non Creamy layer Certificate देण्याची कार्यपद्धती कशी राहील याबाबत २५ मार्च २०१३ रोजी एक सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला आहे.त्याचा सर्व संबंधितांनी जरूर अभ्यास करावा.
Non Creamy layer साठी पूर्वी ४.५ लाख एव्हढी उत्पन्नाची मर्यादा होती. सदर उत्पन्नाची मर्यादा २४ जून २०१३ च्या शासन निर्णयाने ६ लाख करण्यात आली आहे.
दि. २५ मार्च २०१३ व २४जुन २०१३ हे दोन्ही शासन निर्णय या ब्लॉगवर " Criteria for Creamy Layer" या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबंधितांनी ते जरूर डाउनलोड करून घ्यावेत.