१ जानेवारी २००६ नंतर निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनांत सुधारणा करण्याबाबतचे आदेश शासनाने दि. ३०-१०-२००९ च्या शासन निर्णयाद्वारे काढलेले आहेत.मात्र सदर आदेश १ जानेवारी २००६ ते २७ फेब्रुवारी २००९ या काळात निवृत्त झालेल्या कर्मचा-यांना लागू करण्यात आले नव्हते. सदर निर्णयास आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली होती.
सदर याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाने, १ जानेवारी २००६ ते २७ फेब्रुवारी २००९ या काळात सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचा-यांना देखील सुधारित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा असा महत्वपूर्ण निकाल नुकताच दिला आहे.तो निश्चितच राज्यातील निवृत्ती वेतनधारकांना दिलासा देणारा आहे.